ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

जिल्हाधिकार्‍यांनी केली इरई नदीची पाहणी

जलसंपदा व ग्रामविकास मंत्री 25 मे रोजी पाहणी करणार
चंद्रपूर, दि. 20 (प्रतिनिधी)-  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने सुरु असलेला इरई नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम प्रशासन प्रभावीपणे राबवित असून या कामाची पाहणी करण्यासाठी 25 मे रोजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे चंद्रपूरला येणार आहेत. या दौर्‍याची पूर्व तयारी म्हणून जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी इरई नदीची पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासोबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सोनोने, कार्यकारी अभियंता इश्वर आत्राम व अधिकारी हजर होते. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारही यावेळी उपस्थित राहणार आहेत. कारखान्याची राख व ओव्हर बर्डनमुळे लुप्त पावलेली इरई नव्याने पुनर्जन्म घेत आहे. प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ.राजेंद्रसिंग यांनी 8 मे रोजी नदीची पाहणी करून समाधान व्यक्त केले होते. आज पडोली, दाताळा व चौराळा याठिकाणी प्रशासनाने सुरु केलेल्या इरई पुनरुज्जीवन कार्यक्रमाची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी सलील यांनी केली.
दुर्गापूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामधील राख व ओव्हर बर्डनमुळे इरईचा मूळ प्रवाह बदलला होता. यामुळे इरईचे मूळ रुप नष्ट होण्याच्या मार्गावर असताना पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन इरई पुनरुज्जीवन कार्यक्रम हाती घेतला आहे. आज जिल्हाधिकारी यांनी पाहणी करून महत्वाच्या सूचना केल्या. त्याचप्रमाणे नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमाची प्रगती जाणून घेतली.