ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शिक्षक हितासाठी संघटनाविहरीत काम करावे - डॉ.रणजित पाटील

यवतमाळ, दि. 23 (प्रतिनिधी)- शिक्षकांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी शिक्षकाला केंद्रबिंदू मानून संघटना विरहीत कामे करावे, असे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. येथील नंदुरकर विद्यालयाच्या सभागृहात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना सेवा पुस्तकाचे वितरण तथा उत्कृष्ट काम करणार्‍यांचा गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पालकमंत्री संजय राठोड तर प्रमुख पाहुणे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, डाएटचे प्राचार्य डॉ.रवींद्र अंबेकर आदी उपस्थित होते. दुय्यम सेवा पुस्तके शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांसाठी महत्वाचा दस्तावेज आहे. त्यामुळे दुय्यम पुस्तके त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. हाच दृष्टीकोन समोर ठेऊन सदर वितरण करण्यात येत आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने हा चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल डॉ.पाटील यांनी शिक्षण विभागाचे कौतुक केले. 
जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी उत्कृष्ट कार्य करण्याची प्रेरणा या कार्यक्रमातून घ्यावे, असे पालकमंत्री संजय राठोड म्हणाले. यावेळी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांचेही भाषण झाले. जिल्हाभरातील 355 अनुदानीत शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना दुय्यम सेवापुस्तकाचे वितरण करण्यात आले. तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत चांगले काम केल्याबद्द्ल दारव्हा येथील गटशिक्षणाधिकारी प्रमोद सुर्यवंशी, विलास घाटगे, विजय ढाले, गणेश निमकर, एफ.वाय.खान, जीवन पाटील, रावसाहेब कडू, रजणी चौधरी, विलास काळे, रमेश ढगे, कुसुम झाडे, कल्पणा हजारे, नरेंद्र सोनवणे या केंद्रप्रमुख व विस्तार अधिकार्‍यांना गौरविण्यात आले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी केले. कार्यक्रमाचे निवेन श्रीकृष्ण खोब्रागडे व डॉ.प्रशांत गावंडे यांनी केले. तर वेतनपथकाचे अधिक्षक आभार शेळके यांनी मानले.