ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पाच दिवसात वादळग्रस्त भागातील नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करा - बावनकुळे

नागपूर, दि. 24 (प्रतिनिधी)- येत्या शुक्रवारपर्यंत काटोल-नरखेड तालुक्यातील वादळग्रस्त भागाचा वीजपुरवठा सुस्थितीत करा. तसेच नुकसानग्रस्त नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत युध्दस्तरावर पुरवा. उन्हाळा असल्यामुळे या भागातील पाणीटंचाईचे निवारण महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी स्वत: उपस्थित राहून करावे. पाच दिवसात गावांचे नियमितपणे व्यवहार सुरु व्हावेत अशा व्यवस्था करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी जिल्हा प्रशासन व महावितरणच्या अधिकार्‍यांना दिले.
काटोल-नरखेड तालुक्यात गेल्या 19 मे रोजी आलेल्या चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करुन वादळग्रस्तांना पुरवण्यात येणार्‍या सोयी सुविधांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री बावनकुळे यांनी आज या भागाचा दौरा केला. यावेळी आमदार डॉ. आशिष देशमुख, डॉ. राजीव पोतदार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिपचे शिक्षण सभापती उमेश चव्हाण, महावितरणचे मुख्य अभियंता प्रसाद रेशमे, काटोलचे उपविभागीय अधिकारी अविनाश कातडे व अन्य यंत्रणा उपस्थित होती.
गेल्या 19 मे रोजी झालेल्या चक्रीवादळाच्या तडाख्याने जामगाव व खापा या दोन गावांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. जामगावातील 152 घरांचे नुकसान झाले. तर 108 हेक्टर जमिनीवरील पिकाचे नुकसान वादळाने झाल्याचे आढळले. वादळाच्या तडाख्यात एकूण 10 गावे सापडली होती. ही दहा गावे नरखेड तालुक्यातील होती. 5 मिनिटे झालेल्या या वादळात 385 घरांचे नुकसान होऊन 335 हेक्टर जमिनीवरील शेतकर्‍यांच्या पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक सर्वेक्षणचा अहवाल आहे.
वादळानंतर सुमारे आठवडाभरात जनजीवन सामान्य होत आहे. शासनाच्या संबंधित विभागाच्या चमू या भागात दाखल झाल्या आहेत. शेतकर्‍यांना नुकसानीचा अंदाज व सर्वेक्षण सुरु असून अनेकांची घरावरील छपरे उडून गेली. जनावरांचे गोठेही जमीनदोस्त झाले. वादळामुळे एक गाय व एक बैल दगावला. या दोन्ही जनावरांची नुकसान भरपाई संबंधित शेतकर्‍याला देण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.