ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महिलांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार - विजया रहाटकर

नागपूर, दि. 25 (प्रतिनिधी)- महिलांच्या कौटुंबिक व इतर समस्या सोडविण्यास राज्य महिला आयोग सर्वोच्च प्राधान्य देणार असून ’आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबवून प्रत्येक विभागात जनसुनावणी घेऊन मोठ्या प्रमाणात प्रकरणे निकाली काढणार असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. 
रविभवन येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात विभागीय महिला जनसुनावणी कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आयोगाचे सदस्य सचिव ए. एन. त्रिपाठी, सदस्या श्रीमती नीता ठाकरे, उपसचिव ला. रा. गुजर, प्रकल्प अधिकारी लक्ष्मण मानकर व तक्रारदार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. विजया रहाटकर म्हणाल्या की, राज्य महिला आयोग महिलांच्या कौटुंबिक व इतर समस्या तसेच महिलांना होणार्‍या मारहाणीबाबत येणार्‍या तक्रारींवर गांभीर्याने विचार करत असून अशा केसेसमध्ये पोलीस विभागाने तातडीने कारवाई करावी व जलद न्यायालयाच्या माध्यमातून गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या विभागीय महिला जनसुनावणीसाठी दोन पॅनल तयार करण्यात आले असून यात स्वत: अध्यक्षा विजया रहाटकर व सदस्य सचिव ए. एन. त्रिपाठी हे महिलांच्या समस्या व तक्रारी ऐकत होते. उपस्थित असलेले पोलीस अधिकारी, संरक्षण अधिकारी यांना सूचना देत होते. या विभागीय महिला जनसुनावणीत मोठ्या प्रमाणात आठही जिल्ह्यातील महिलांचे तक्रारीचे प्रकरणे दाखल झालेली असून काही महिलांनी तक्रार दाखल करताना दैनिक वृत्तपत्रात वाचून आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी आलो असल्याचे अध्यक्षांना सांगितले. राज्य महिला आयोगातर्फे 58 प्रकरणांवर सुनावणी कौटुंबिक हिंसाचार कायदा खूप सशक्त असला तरी समाजात आजही महिलांचे शोषण होतच आहे. अशा प्रकरणांना आळा बसावा यासाठी प्रत्येक विभागात जनसुनावणी घेण्यात येत असून आज नागपूर विभागात एकूण 58 विविध प्रकरणांवर जनसुनावणी करण्यात आली असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली. रविभवन येथील सभागृहात माहिती देतांना म्हणाल्या की, विभागीय महिला जनसुनावणीत 58 विविध प्रकरणांत 30 कौटुंबिक, 9 सामाजिक, 5 मारहाणी, 3 कामाच्या ठिकाणी छेडछाड व इतर 11 अशा 58 प्रकरणांवर चर्चा होऊन त्या वेगवेगळ्या विभागाकडे कारवाईसाठी पाठविण्यात आल्या.त्यात नागपूर- 51 प्रकरणे, गोंदिया- 1, भंडारा-4, गडचिरोली-1, अकोला-1 तसेच अमरावती, चंद्रपूर व वर्धा या जिल्ह्याचे प्रकरणे दाखल झालेले नाहीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.