ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

यवतमाळ जिल्ह्यात पायाभूत सुविधा उभारण्यावर भर - पालकमंत्री राठोड

यवतमाळ, दि. 25 (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुरांसोबतच सर्वसामान्य नागरिकांना तातडीच्या सुविधा व दिलासा दिला जात आहे. यासोबतच भविष्यात सर्वच क्षेत्रात चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दीर्घकालीन कार्यक्रमही हाती घेण्यात आले असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
नेरच्या प्रांगणात तालुक्यातील विविध विकास कामांचे सामूहिक भुमिपुजन व लोकार्पण पालकमंत्र्यांच्यास्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार भावना गवळी तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष पवन जयस्वाल, पंचायत समिती सभापती भरत मसराम, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, पंचायत समिती सदस्य मिना खांदवे आदी उपस्थित होते.
महसूल विभाग सामान्यांच्या कल्याणाचा विभाग आहे. या विभागाचे कायदे जुने असून त्यातील अनेक बाबी कालबाह्य झाल्या आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी काम करताना त्या अडचणीच्या ठरतात. त्यामुळे गेल्या केवळ दीड वर्षात विविध कायद्यांमध्ये 40 नवीन दुरूस्त्या करण्यात आल्या. जिल्ह्यातील सर्वसामान्यांना वीज, पाणी यासह चांगल्या पायाभूत सुविधा उभारणीवर आपला भर आहे. त्यामुळे अनेक चांगले निर्णय घेण्यात आले असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. 
नेर येथील वीज प्रश्न मार्गी लावण्यासाठी दारव्हा वरून विशेष लाईन टाकण्यात आली. आता स्वतंत्र 220 केव्हीचे केंद्रच नेरला मंजूर झाले आहे. जलयुक्त शिवारमधून जास्तीत जास्त कामे नेर तालुक्यात घेण्यात आली आहे. भविष्यात आणखी कामे घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
157 कोटी खर्चून विविध विकास कामे
पालकमंत्र्यांच्याहस्ते भुमिपुजन व लोकार्पण झालेल्या कामांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 53 कोटी 24 लाखाच्या कामांचा समावेश आहे. यासोबतच स्थानिक विकास निधी 2 कोटी 51 लाख, जिप पाणीपुरवठा 3 कोटी 6 लाख, पोलीस विभाग 20 लक्ष, जलयुक्त शिवार 9 कोटी 14 लाख, पंचायत समिती 4 कोटी 21 लाख, शिक्षण विभाग 9 लाख 33 हजार, जिप बांधकाम 2 कोटी 74 लाख, क्रीडा 89 लाख, नगर परिषद 35 कोटी 25 लाख, जिप सिंचन 1 कोटी 10 लाख, कृषि विभाग 31 लाख 62 हजार, वने 2 कोटी 24 लाख, वीज वितरण 16 कोटी 70 लाख, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना 8 कोटी 80 लाख, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना 2 कोटी 72 लाख, लघु पाटबंधारे 9 कोटी 32 लाखांच्या कामांचा समावेश आहे.