ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

स्वच्छ कार्यालयाद्वारे स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करा- अण्णासाहेब मिसाळ

धुळे, दि. 26 (प्रतिनिधी)- शुक्रवार, दि. 27 मे रोजी जिल्ह्यातील सर्व कार्यालयांमध्ये कार्यालय व परिसर स्वच्छतेबाबत मोहीम राबविण्यात येणार असून स्वच्छ कार्यालयाद्वारे स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शासकीय कार्यालये व परिसर स्वच्छतेबाबतची बैठक जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित करण्यात आली होती. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रकाश वायचळ, मनपा आयुक्त डॉ. नामदेव भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत आदी उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी म्हणाले की, शुक्रवारी सकाळी 7 ते 9 या वेळेत प्रत्येक शासकीय कार्यालयातील कार्यालयीन जागा ही नीटनेटकी व सुटसुटीत करण्यात यावी. कार्यालयातील छन्नमार्ग (पॅसेज) तसेच पायर्‍यांवर स्वच्छता राखून सदर मार्गात कोणतेही कार्यालयीन वस्तू, दस्ताऐवज, कपाट ठेवू नये. तसेच कार्यालयातील जागेत पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी नस्ती, ऑफिस फाईल्स, कागदपत्रे इत्यादी सुयोग्य पद्धतीने ठेवण्यात यावीत. कार्यालयीन तसेच कार्यालय परिसर जसे स्वच्छतागृहे, लिप्ट इत्यादी जागा नेहमीच स्वच्छ व टापटीप राहील याची दक्षता घेण्यात यावी. त्याचबरोबर कार्यालयाच्या लगतच्या बाहेरील जागा उदा. पार्किंग लॉट, कार्यालयातील येण्या-जाण्याचा मार्ग इत्यादी ठिकाणी देखील तशीच स्वच्छता राखण्यात यावी. कार्यालय तसेच कार्यालय परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी विनावापरातील वाहने, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स व विद्युत उपकरणे इत्यादी जड वस्तु यांची जाणीवपूर्वक विल्हेवाट लावण्यात यावी. कार्यालयीन अभिलेख तसेच दस्ताऐवजांची रितसर नोंदणी करण्यात यावी.
अपर जिल्हाधिकारी प्रकाश वायचळ म्हणाले की, दिलेल्या सूचनांच्या आधारे विभागाच्या अधिनस्त प्रत्येक कार्यालयाने स्वच्छता, कार्यालयीन स्वच्छता अभियान तातडीने सुरु करावे. तसेच, कार्यालय व परिसरातील स्वच्छता राखण्यात सातत्य राहावे, याकरिता असे अभियान नियमितपणे द्वैमासिक अथवा त्रैमासिक पद्धतीने राबविण्यात यावे. निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी प्रास्ताविक करुन सर्वांचे आभार मानले.