ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

नाशकात तृप्ती देसाईंच्या गाडीवर दगडफेक

नाशिक, दि. २७ (प्रतिनिधी) - भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांच्या गाडीवर काल रात्री बाराच्या सुमारास २० ते २५ अज्ञात व्यक्तींनी दगडफेग केली. यामध्ये त्यांच्या काही महिला कार्यकर्त्या जखमी झाले आहेत.

तृप्ती देसाईंच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीत गाडीच्या सर्व काचा फुटल्या. तर भूमाताच्या काही कार्यकर्त्या जखमी झाल्या आहेत. तृप्ती देसाई या पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी पंचवटी भागात गेल्या होत्या. मात्र, त्याच भागात असलेल्या कपालेश्वर मंदिर परिसरात त्या पोहोचल्या. तिकडे जमलेल्या लोकांना तृप्ती देसाई पुन्हा मंदिरात प्रवेश करण्यासाठी आल्या असं वाटलं त्यावेळी त्यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. असं देसाई यांचं म्हणणं आहे. 

दरम्यान, पोलिसांनी यावेळी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. इतकंच नाही तर दुचाकीवर असलेल्यांनी त्यांचा २५ किमी पाठलाग केल्याचंही त्यांनी सांगितंल आज सकाळी तृप्ती देसाई या पोलिसांत तक्रार नोंदवणार आहेत.