ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणार - मुख्यमंत्री

नागपूर, दि. 28 (प्रतिनिधी)- कौशल्य आत्मसात केले तर रोजगाराच्या व उद्योजक बनण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. देशाच्या व राज्याच्या प्रगतीसाठी कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याला प्राधान्य दिल्यामुळे युवक-युवतींसमोर अनेक संधी उपलब्ध होत आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी युवा पिढीने कौशल्य आत्मसात करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मिशन दिशाअंतर्गत मुख्यमंत्र्यांसोबत दिलखुलास चर्चा या कार्यक्रमात कौशल्य सखी सोबत संवाद साधला. 
कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, युएनडीपी तसेच प्रथम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणानंतर 500 युवतींचे मुख्यमंत्र्यांसोबत दिलखुलास चर्चा या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विभागातील युवतींनी विचारलेल्या प्रश्नांना तेवढ्याच दिलखुलासपणे उत्तरे देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौशल्य आत्मसात करण्याचा महत्त्वपूर्ण टिप्स या उपक्रमाद्वारे दिल्यात. 
आयटीपार्क परिसरातील पर्सिस्टंट सभागृहात युवतींसोबत दिलखुलास चर्चा या कार्यक्रमास राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गृह तसेच कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, महापौर प्रवीण दटके, खासदार कृपाल तुमाने, युएनडीपीचे भारतातील प्रतिनिधी क्लेमो शेओ, प्रथम फाऊंडेशन संस्थेचे प्रमुख डॉ. माधव चव्हाण, कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर, विभागीय आयुक्त अनूप कुमार, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त विजय वाघमारे आदी उपस्थित होते. 
कौशल्य विकास उपक्रमाअंतर्गत विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात आले असून या संधीचा युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. कौशल्य विकास हा उपक्रम 8 मार्च या महिलांदिनापासून नागपूर व औरंगाबाद येथे सुरु झाला असून मिशन दिशा अंतर्गत कौशल्य सखींना स्मार्ट पिसीद्वारे 25 तासांचे प्रशिक्षण देण्यात येते. यासाठी 150 विविध ट्रेडमध्ये आवश्यक असलेल्या स्कील संदर्भात माहिती देण्यात येते. विदर्भातील युवतींना वेगळ्याप्रकारचे प्रशिक्षण देऊन तसेच त्यांचे कौशल्य विकास विभाग व युएनडीपी अंतर्गत समुपदेशन करण्यात येते. या उपक्रमामध्ये 450 युवती सहभागी झाल्या होत्या. 
प्रारंभी कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी स्वागत करुन प्रास्ताविक केले. प्रथम फाऊंडेशन संस्थेचे माधव चव्हाण यांनी कौशल्य प्रशिक्षणासंदर्भात यावेळी माहिती दिली. मुख्यमंत्र्यांसोबत दिलखुलास चर्चा या कार्यक्रमाचा समारोप कौशल्य विकास विभागाचे राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या भाषणाने झाला.