ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

केंद्रीय पथकाने केली दुष्काळी भागाची पाहणी

जाम गावातील शेतकर्‍यांनी मांडल्या आपल्या कैफियती
वर्धा, दि. 3 (प्रतिनिधी)- सन 2015 मधील खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून अशा शेतकर्‍यांना केंद्र शासनामार्फत मदत मिळावी यासाठी वर्धा जिल्ह्यातील शेतकर्‍यांशी चर्चा करण्यासाठी आलो आहोत, असे केंद्र शासनाच्या निती आयोगाचे अधिकारी डॉ.रामानंद यांनी समुद्रपूर तालुक्यातील जाम येथे शेतकर्‍यांशी चर्चा करतांना सांगितले. 
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील जाम येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात बुधवारी केंद्र शासनाच्या दुष्काळ पाहणी पथकातील सदस्य निती आयोगाचे अधिकारी डॉ.रामानंद, केंद्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे अवर सचिव राम वर्मा, केंद्र शासनाच्या जलसंसाधन विभागाचे उपसंचालक मिलींद पानपाटील, भारतीय खाद्य निगम, मुंबईचे ए.जी.एम. एम.एम.बोराडे, डायरेक्टर सेंट्रल इलेक्ट्रीसिटीचे जे.के.राठोड यांनी जाम गावातील शेतकर्‍यांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. 
यावेळी काही शेतकर्‍यांनी कैफियत मांडतांना सांगितले, खरीपाचा हंगाम गेल्यावर रब्बी हंगाम चांगला होईल या आशेवर शेतकर्‍यांनी रब्बीसाठी खर्च केले. परंतु अचानक गारपीट आल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यापुढे या जिल्ह्यातील शेतकरी हवालदील झालेला असून त्याला शासकीय मदतीची मोठ्या प्रमाणात गरज आहे, अशी मागणीही शेतकर्‍यांनी पथकाकडे केली. काही शेतकर्‍यांनी जलयुक्त शिवारांची कामे या परिसरात सुरु करण्यात यावीत, पिकांचे निल गाई मोठ्या प्रमाणात नुकसान करतात त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही त्यांनी पथकाकडे केली. 
या पथकासोबत अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलवडे, समुद्रपूरचे तहसिलदार सचिन यादव, हिंगणघाटचे तहसिलदार दीपक कारंडे, कृषी सहसंचालक विजय घावडे, जिल्हा कृषी अधिकारी डॉ.भारती इत्यादी उपस्थित होते.