ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शेतकरी मदतीचे 18 प्रस्ताव मंजूर; आत्महत्या निर्मूलन सहाय्यता समितीचा निर्णय

धुळे, दि. 4 (प्रतिनिधी)- शेतकरी आत्महत्या झालेल्या एकूण 24 मदतीच्या प्रस्तावांपैकी 18 प्रस्तावांना मंजुरी देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या शेतकरी आत्महत्या निर्मूलन व सहाय्यता समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात बैठक झाली. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलावळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, राहुल पाटील, तहसीलदार दत्ता शेजूळ (महसूल), अनिल मोरे (धुळे), महेश शेलार (शिरपूर), गायत्री सैंदाणे (शिंदखेडा), अपर तहसीलदार ज्योती देवरे, नायब तहसीलदार अरुण देवरे, माजी आमदार जे. यू. ठाकरे यावेळी उपस्थित होते.
या बैठकीत शेतकरी आत्महत्येबाबत प्राप्त प्रस्तांवावर चर्चा झाली. धुळे तालुक्यातून 6, साक्री व शिरपूर तालुक्यातून प्रत्येकी 2, तर शिंदखेडा तालुक्यातून शेतकरी आत्महत्येबाबतचे 14 प्रस्ताव दाखल झाले होते. त्यापैकी 18 प्रस्ताव मंजूर झाले, तर 5 प्रस्ताव अपात्र ठरले. एका प्रस्तावाच्या फेरचौकशीचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.