ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अन्नधान्य वितरणासाठी अर्थसंकल्पात 25 कोटी रुपयांची पुरवणी मागणी मंजूर- बापट

अमरावती, दि. 10 (प्रतिनिधी)-राज्यातील गोरगरीब व दुर्बल घटकातील कुटूंबांना माफक दरात अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी तसेच 97 गोदामांच्या बांधकामासाठी अर्थसंकल्पात 25 कोटी रुपयांच्या पुरवणी मागणीस मंजुरी मिळाली असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक मंत्री गिरीष बापट यांनी दिली.
धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे येथील नवीन शासकीय धान्य गोदामांचा लोकार्पण सोहळा बापट यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाला आमदार वीरेंद्र जगताप, उपायुक्त (पुरवठा) रमेश मावसकर, जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखडे, उपविभागीय अधिकारी (चांदूररेल्वे) जर्नादन विधाते, तहसीलदार (धामणगाव रे.) सी. सी. कोहरे, तहसीलदार (चांदूर रेल्वे) बी. ए. राजगडकर, धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे तालुक्याचे सरपंच, उपसरपंच प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रारंभी अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागाद्वारे नव्याने बांधण्यात आलेल्या धामणगाव रेल्वे येथील शासकीय धान्य गोदामाचे गिरीष बापट यांचे हस्ते फित कापून लोकार्पण करण्यात आले. यानंतर चांदूर रेल्वे येथील नवीन शासकीय गोदामाचे बापट यांचे हस्ते कोनशीलेचे अनावरण केले. अन्नधान्य साठवून ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या गोदामांचे महत्त्व सांगून बापट म्हणाले की, राज्यात अन्नधान्य ठेवण्यासाठी नव्याने 97 गोदामे उभारण्यात येणार आहे. राज्यात सुमारे 10 हजार 216 शेतकर्‍यांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देऊन अल्पदरात दोन ते तीन रुपये प्रती किलोप्रमाणे अन्नधान्याचे वितरण करण्यात आले आहे. अन्नधान्याची काळाबाजारी रोखण्यासाठी अन्न व नागरीपुरवठा विभागाद्वारे प्रत्येक रास्त दुकानदारांना व शासकीय गोदामांना बायोमेट्रीकप्रणाली व सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. या योजनेत सहभागी होणार्‍या रास्तभाव दुकानदारांना खात्यामार्फत देण्यात येणार्‍या कमिशनमध्ये वाढ करण्यात येईल. 
कापूस, तूरदाळ व सोयाबिन या पिकांचे कोठार म्हणून विदर्भाची ओळख आहे. राज्यातील सामान्य जनतेला माफक दरात तूरदाळ उपलब्ध व्हावी यासाठी तसेच तूरदाळीचे साठेबाजी, रोखण्यासाठी आता तूरदाळीचे भाव राज्य सरकार ठरविणार आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती बापट यांनी दिली. शेतकर्‍यांसाठी खात्रीचे पीक तूरदाळ आहे. या भागात तुरीचे उत्पादन चांगले होत असल्यामुळे तुरीचा पेरा वाढला पाहिजे, असे आवाहन त्यांनी शेतकर्‍यांना केले. तुरीच्या पिकाची पेरणी करणार्‍यांना शासनाकडून प्रोत्साहन निधी सुध्दा दिला जातो. नव्याने उभारण्यात आलेल्या गोदामाची क्षमता एक हजार मेट्रीक टन अशी आहे. त्यामुळे दोन वर्ष पिकाचे उत्पादन कमी झाल्यास येथील नागरिकांना अन्नधान्याचे वितरण होऊ शकेल. दोन्ही शासकीय गोदामांचे पाया व बांधकामास 2013 मध्ये सुरुवात करण्यात आली असून आजमितीस गोदामांची भव्य इमारत सज्ज आहे. दोन्ही गोदामांची एक हजार मेट्रीक टन अन्नधान्य साठवणूक क्षमता आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वानखडे यांनी प्रास्ताविकात दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवानी गुल्हाने हिने केले तर तहसीलदार राजगडकर यांनी आभार मानले.