ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रायपूरच्या वेणा, दुर्गा नद्या पुन्हा झाल्या पाणीदार - मुख्यमंत्री

नागपूर, दि. 28 (प्रतिनिधी)- रायपुरातील गावकर्‍यांनी वेणा व दुर्गा नदीच्या संगमातील पात्रात साचलेला गाळ काढून या नद्यांना परत त्यांचे मूळ स्वरुप प्राप्त करुन दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले.
जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने तसेच गावकर्‍यांच्या पुढाकाराने वेणा व दुर्गा नदीतील गाळ काढला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या कामाची पाहणी करुन गावकर्‍यांचे कौतूक केले.
आता या नदीत पाण्याचा मोठा साठा गोळा झाला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी येथे नदीच्या काठावर वृक्षारोपणही केले. याप्रसंगी आमदार समीर मेघे, महिन्द्रा ण्ड महिन्द्रा कंपनीचे आशुतोष त्रिपाठी होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावकर्‍यांना संबोधित केले. गावकर्‍यांनी नदीतील गाळ काढल्यामुळे येत्या 25 वर्षाची पाण्याची व्यवस्था करुन ठेवली आहे. आता खर्‍या अर्थाने या नद्या झालेल्या आहेत. यासाठी लागणारा जादाचा 25 लाख रुपयांचा निधी खासदार अजय संचेती आपल्या खासदार निधीतून देतील, अशी घोषणा यानंतर झालेल्या समारंभात केली.