ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

विदर्भात पावसामुळे पूरपरिस्थिती; वीज कोसळून 3 ठार; बैलगाडीही गेली वाहून

बुलढाणा, दि. 28 (प्रतिनिधी)- सोमवारी सातपुड्याच्या पर्वतरांगेत जोरदार पाऊस झाल्याने विदर्भात काही ठिकाणी पुरपरिस्थिती आहे. जामोदच्या नदीला आलेल्या पुरात एक युवक बेपत्ता झाला तर वर्धा जिल्ह्यात वीज कोसळून सोमवारी तीन जण ठार झाले आहेत. खेर्दा (संग्रामपूर) येथे बैलगाड्यांसह चार बैल वाहून गेले.
आकोट शहराजवळच्या मोहाळी नदीला पूर आला. त्यामुळे काही काळ आकोट-तेल्हारा मार्ग बंद पडला होता. परिसरातील नदी-नालेही दुधडी भरून वाहू लागले. मोहाळी नदीच्या पुलावरून पाणी गेल्याने हा मार्ग बंद पडला होता. दरवर्षी हा मार्ग पावसाळ्यात बंद पडत असल्याने वाहतूक प्रभावित होते. ज्या ठिकाणी कमी उंचीचे पुल आहेत तेथे लोकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. संग्रामपूरवरुन तेल्हाराकडे जाणारा मार्ग पुरामुळे बंद होता. खेर्डा आणि निवाणा नदी तसेच वान नदीलाही पूर आला आहे. वसंता बोबडे असे या युवकाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती जळगाव जामोदचे तहसीलदार अनिल हेलकर यांना देण्यात आली त्यानंतर त्यांनी युवकाचा शोध घेण्यास सुरुवात केली, पण युकाचा पत्ता लागला नाही.गावकरी या त्याचा शोध घेत आहेत.
वर्धा जिल्ह्यात वीज कोसळून सोमवारी तीन जण ठार झाले आहेत. आर्वी तालुक्यातील लाहदेवी शिवारात मेश्राम यांच्या शेतात जयश्री धुर्वे, अनिकेत परतेकी, यांचा जागीच मृत्यू झाला. सेलू तालुक्यातील महाबळा येथे शील पारधी यांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे.
खेर्दा (संग्रामपूर) येथील रामदास राउत शेतातून घरी परत येत असताना शेतातील नाल्याला पुर आला असता पुरात त्यांची बैलगाडी, दोन बैल शेतपयोगी साहित्य वाहून गेले तसेच अवचित क्षिरसागर यांची सुद्धा बैलगाड़ी आणि दोन बैल पूरात वाहून गेले आहेत. चार बैलांपैकी आतापर्यंत एक बैल मिळाला आहे.