ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सामान्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांवर भर द्या - पोटे

अमरावती, दि. 15 (प्रतिनिधी)-सामान्य जनता, शेतकरी व महिलांना समन्वयीत कृषि विकास प्रकल्पाद्वारे (केम) जिल्ह्यात यशस्वी झालेल्या लघु उद्योग व ग्रामोद्योगांचा दाखला देऊन पारंपरिक शेती पीक उत्पादनासोबतच इतर शेतीपुरक जोडधंदे उभारण्यासाठी प्रोत्साहित व प्रवृत्त करावे. त्यांची आर्थिक स्थिती सबळ करण्यासाठी रोजगारक्षम नाविण्यपूर्ण उपक्रमांवर भर देण्यात यावा, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांनी केम प्रकल्पामार्फत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध विकासात्मक योजनांचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी किरण गित्ते, समन्वयीत कृषि विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक गणेश चौधरी, जिल्हा समन्वयक अधिकारी कुशल राठोड, केम प्रकल्पाचे अधिकारी सुर्वे, आंतरराष्ट्रीय कृषिविकास निधीचे अधिकारी, सर रतन टाटा ट्रस्टचे अधिकारी तसेच केम प्रकल्पांतर्गत चौदाही तालुक्याचे तालुका समन्वयक आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 
पोटे म्हणाले की, कृषि उत्पन्न वाढविण्याच्या प्रयत्नामध्ये योगदान देऊन प्रकल्प क्षेत्रातील कुटुंबाचा, शाश्वत वैविध्यपूर्ण उत्पन्नाच्या स्त्रोतासह, कृषी व कृषियेत्तर उत्पन्नाच्या साधनाद्वारे विकास करणे त्याचप्रमाणे उत्पादनातील जोखिमीमुळे दारिद्य्र व नैराशाच्या परिस्थितीत न जाता कुटुंबांना सुस्थितीत पुनर्स्थापित करणे हा केम प्रकल्प निर्माण करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पामध्ये आंतरराष्ट्रीय कृषिविकास निधी व सर रतन टाटा ट्रस्ट यांच्याद्वारे संयुक्त पद्धतीने योजना राबाविण्यासाठी निधी दिला जातो. जिल्ह्यातील चौदा तालुक्यात विकासात्मक योजना राबविण्यासाठी दहा क्लस्टरमध्ये सर रतन टाटा ट्रस्टमार्फत सुमारे 75 कोटी रुपयाचा निधी केम प्रकल्पाला देण्यात आला आहे. यामध्ये जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून सिंचन सुविधा, रेन वॉटन हारवेस्टींग, शेतकर्‍यांच्या उत्पादीत मालाचे मार्केटींग, बचतगटाचे सबळीकरण, शेळीपालन, कुकुटपालन, ग्रामोद्योग व कुटीर उद्योग उभारणी, दालमिल-लघु उद्योग, शेती विषयक प्रशिक्षण आदी बाबींचा मुख्यत्वे समावेश आहे. शेतकर्‍यांनी, बेरोजगार युवकांनी तसेच महिलांनी केमद्वारे राबविण्यात येणार्‍या योजनांचा लाभ घ्यावा.
जिल्हाधिकारी किरण गित्ते म्हणाले की, सन 2008 मध्ये केम प्रकल्प सुरु झाला असून आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्राधान्याने मदत व्हावी, नैराशग्रस्त कुटुंबांना एक आधार व्हावा या प्रामाणिक हेतुने केम प्रकल्पाची शासनाने राज्यात सुरूवात केली आहे. सुमारे तीन लाख कुटुंबांना या प्रकल्पाद्वारे मदत झाली असून प्रत्येकाने स्वयंरोजगार स्थापित केला आहे. केम प्रकल्पामार्फत यावर्षी सुमारे 14 कोटी रुपये उद्योग उभारणीसाठी खर्च करण्यात आले आहे. या निधीचा फायदा ग्रामीण भागातील जनतेला झाला किंवा नाही यासाठी यशस्वी युनिटची यशोगाथा इतरांच्या निर्दशनास आणून द्यावी. केम प्रकल्प व मआविम विभागाने महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण व लघुउद्योग उभारणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.