ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

जगातील सर्वात कुशल तरुणाई भारतात- डॉ. हिना गावीत

नंदुरबार, दि. 16 (प्रतिनिधी)- कौशल्य विकास ही देशासाठी काळाजी गरज आहे. शिक्षणाचा उद्देश केवळ पदवी बहाल करण्यापुरता मर्यादित नसून त्यातून कौशल्य विकासाची चालना मिळण्यासाठी आवश्यक आहे. कौशल्य विकासात भारत आज जगातील प्रमुख राष्ट्रांच्या खाद्याला खांदा लावून स्पर्धा करतोय तसेच जगातील सर्वात कुशल तरुणाई भारतात असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. हिना गावीत यांनी केले.
जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत जागतिक युवा कौशल्य दिनाच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. गावीत बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक लक्ष्मीकांत खेडेकर, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहाय्यक संचालक अनिला तडवी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपेद्र सांगळे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य आर.टी. कोकणी आदी उपस्थित होते.
डॉ. गावीत म्हणाल्या, हमखास नोकरीपेक्षा शाश्वत रोजगारासाठी शिक्षण आवश्यक आहे. शिक्षणाला केवळ तत्कालीन संदर्भाची जोड न देता आगामी 25 ते 30 वर्षे उपयोगात येईल अशा उद्देशाने शिक्षणाची निवड तरुणांनी करायला हवी. देशातील बेरोजगारी संपवायची असेल तर कौशल्य विकासासारखा दुसरा पर्याय नाही. कौशल्य विकास कार्यक्रमाला केंद्र सरकारने मुद्रा बँक योजनेची जोड दिली असून या माध्यमातून कोणत्याही तारण अथवा सिक्युरिटीशिवाय कर्जाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे जिल्ह्यातील कौशल्य विकास संस्थांना प्रशिक्षित तरुणांपैकी 80 टक्के तरुणांना रोजगार उपलब्ध करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. डॉ. कलशेट्टी म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या युगात स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी शासनाने कौशल्य विकास विभाग सुरु केला आहे. कुठलेही कौशल्य आत्मसात करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळायला हवा. मुलांना गुणवत्तेचे प्रशिक्षण मिळायला हवे. प्रशिक्षण घेताना जीव ओतून प्रशिक्षण घ्यायला हवे, यात प्रशिक्षण देणार्‍या संस्थांचीही जबाबदारी मोठी आहे. त्याचबरोबर बँकाचीही जबाबदारी मोठी आहे. ज्यात आवड आहे त्यात कौशल्य संपादन करुन युवकांना या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. सूत्रसंचालन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे संचालक शशिकांत कुंभार यांनी केले तर आभार डॉ. एन.डी. पाटील यांनी मानले.