ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

प्रदूषण करणारे कारखाने, कंपन्यावर कार्यवाही करा - रामदास कदम

प्रदूषण नियंत्रणासाठी आढावा सभा
चंद्रपूर, दि. 16 (प्रतिनिधी)- प्रदूषण नियंत्रणासाठी वारंवार कारखाने, कंपन्यांना सूचित करण्यात येते, असे असतानाही अनेक कंपन्या शासनाच्या सुचनाकडे दुर्लक्ष करतात. ही बाब वारंवार निर्दशनास आली असून यापुढे असे प्रदूषण करणार्‍यांची गय केली जाणार नाही. कायद्यातील तरतुदीप्रमाणे त्यांच्यावर कार्यवाही करा, असे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले. 
प्रदूषण रोखण्यासाठी चंद्रपूर कृती आराखडा तयार केला जात असून त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित बैठकीच्या वेळी ते बोलत होते. यावेळी आमदार नाना शामकुळे, अनिल धानोरकर, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव तथा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सतीश गवई, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, मनपा आयुक्त संजय काकडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव पुंडलिक निरासे आदी उपस्थित होते.
यावेळी कदम यांनी जिल्ह्यातील उद्योगामुळे होणार्‍या प्रदूषणाची माहिती घेतली. ज्या अतिप्रदूषण करणार्‍या उद्योग, कंपन्यांना नोटीस बजावून उपाय योजना करा. कंपन्याकडून तात्काळ प्रतिसाद मिळत नसल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. प्रसंगी सदोष मनुष्य वधाचा गुन्हेही नोंदवा, असे निर्देश कदम यांनी दिले. 
डब्ल्युसीएल, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, सिमेंट उद्योग आदी उद्योगातून होणार्‍या प्रदूषणाबाबत  कदम यांनी नाराजी व्यक्त केली. कोळशाची अवैध वाहतूक व साठवणूक होत असल्याची बाब बैठकीत निदर्शनास आणून दिल्यानंतर अशा वाहतुकीवर कार्यवाही करा. तसेच अवैध वाहतूक करणार्‍या वाहनांचे परवाने निलंबीत करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रदूषण नियंत्रणाची कार्यवाही येत्या एक महिण्यात करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. 
जिल्ह्यातील पर्यावरण प्रदूषणाची स्थिती गंभीर आहे. याबाबत शासन जातीने लक्ष ठेऊन असून यावर शासनस्तरावर तातडीने उपाय योजना करता याव्या म्हणून विशेष बाब म्हणून जिल्ह्याला पाच अधिकारी, कर्मचारी देणार आहे. या शिवाय मुंबई येथील वरिष्ठ दर्जाचा एक अधिकारी नियमित भेट देऊन पर्यावरण नियंत्रणाचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.