ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

तालुकास्तरावर कुपोषित बालकांसाठी विशेष कार्यक्रम - पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि. 18 (प्रतिनिधी)- जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागात अत्यंत चिंताजनक अवस्थेतील सुमारे दोन हजार 100 कुपोषित बालके आढळली आहे. या बालकांची श्रेणीवाढ करून त्यांना सामान्य बालकांमध्ये आणण्यासाठी या बालकांसाठी येत्या 27 जुलै रोजी प्रत्येक तालुकास्तरावर माता-बालकांच्या तपासणीसोबतच त्यांना पोषण आहार देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.
कुपोषित बालकांचा प्रश्न आणि त्यांना द्यावयाचा पोषक आहाराबाबत बैठक घेण्यात आली.
यावेळी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के. झेड. राठोड आदी उपस्थित होते.
गेल्या महिन्यात झालेल्या महारोग्य शिबीराचाही पालकमंत्री यांनी आढावा घेतला. नोंदणी व्यतिरिक्त वेळेवर झालेल्या रूग्णांना शोधणे हे मोठे आव्हान आहे. आशा कार्यकर्त्यांमार्फत अशा रूग्णांना शोधून त्यांना योग्य उपचार मिळालेला असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक आरोग्य यंत्रणेने नोडल अधिकारी नेमून रूग्णाचे नाव, त्याचा आजार आणि त्याला उपचार मिळालेले ठिकाणी याची यादी तयार करून महाआरोग्य शिबीराची फलश्रुती जनतेसमोर आणावी. या शिबीरातील प्रत्येक रूग्णाला सेवा मिळण्यासाठी 20 जुलै पर्यंत ही यादी तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री राठोड यांनी दिले.
जिल्ह्यात अनेक तालुक्यात जलजन्य आजाराची लागण झाली आहे. पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करूनही त्याचा फारसा परिणाम दिसत नसल्याने आरोग्य यंत्रणेने स्वच्छता विषयक बाबींवर लक्ष केंद्रीत करून जनजागृती करावी. यासाठी कुपोषित बालकांना देण्यात येणार्‍या किटमध्ये हात धुण्याच्या लिक्वीडचाही समावेश करावा, अशी सुचना पालकमंत्री यांनी यावेळी केली. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या नसल्यास ग्रामसेवकाला जबाबदार धरण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.