ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

योजनांचा लाभ मिळवून देणे ही सर्वांची जबाबदारी - पालकमंत्री बडोले

गोंदिया, दि. 18 (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील सर्वसामान्य लाभार्थी हा तालुका पातळीवरील कार्यालयात योजनांचा लाभ घेण्यासाठी येऊ शकत नाही. तेव्हा गावपातळीवरील गरजू लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
15 जुलै रोजी सडक/अर्जुनी पंचायत समिती सभागृहात महासमाधान शिबीराच्या पूर्व तयारीचा आढावा घेताना पालकमंत्री बडोले बोलत होते. सभेला पंचायत समिती उपसभापती विलास शिवणकर, जि.प.सदस्य माधुरी पाथोडे, शिला चव्हाण, पंचायत समिती सदस्य राजेश कठाणे, गिरीधारी हत्तीमारे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, गट विकास अधिकारी लोकरे यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री पुढे म्हणाले, ऑगस्ट महिन्यात आयोजित करण्यात येणार्‍या महासमाधान शिबीराच्या माध्यमातून जवळपास 40 हजार लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याचा आपला संकल्प आहे. या शिबीराच्या यशस्वीतेसाठी विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी/कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींनी नियोजनातून काम करावे. त्यामुळे गरजू लाभार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही.
जिल्ह्यातील अपंग व्यक्तीच्या स्वावलंबनासाठी 2 कोटी रूपयांची तरतूद केली असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, अशा दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी दिव्यांग स्वावलंबन अभियान-2016 राबविणार आहे.
तहसीलदार परळीकर, म्हणाले, महासमाधान शिबीराच्या यशस्वी आयोजनासाठी विविध यंत्रणांच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी टीम वर्क म्हणून काम करावे. लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी कामचुकारपणा करु नये. यावेळी गजानन वाघ यांनी समाधान शिबीराच्या नियोजनाची व दिव्यांग स्वावलंबन अभियानाची माहिती दिली. महासमाधान शिबीराच्या पूर्व तयारी आढावा बैठकीस सडक/अर्जुनी तालुक्यातील अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, कृषी सहायक, यांच्यासह यंत्रणांच्या गावपातळीवरील कर्मचार्‍यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.