ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रा. सु. उर्फ दादासाहेब गवई यांच्या स्मारकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात भव्य स्मारक उभारणार
अमरावती, दि. 26 (प्रतिनिधी)- आंबेडकरी चळवळीतील अग्रणी नेते, बिहार, केरळ व सिक्कीम या राज्याचे माजी राज्यपाल, महाराष्ट्र विधान परिषदेचे प्रदीर्घ काळ सदस्य, उपसभापती व विरोधी पक्षनेता तसेच जागतिक बौध्द महापरिषदेचे उपाध्यक्ष पद भूषविलेले अमरावती जिल्ह्याचे भूमीपुत्र रा. सु. उर्फ दादासाहेब गवई यांच्या कर्तृत्वाची सदैव प्रेरणा देण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचे भूमीपूजन व कोनशीलेचे अनावरण पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी न्यायमूर्ती भूषण गवई, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार सर्वश्री डॉ. सुनील देशमुख, वीरेंद्र जगताप, रवि राणा, ड. यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलीक, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण, दादासाहेबांच्या पत्नी कमलताई गवई, डॉ. राजेंद्र गवई, कीर्ती अर्जून आदी उपस्थित होते.
दिवंगत रा.सु. उपाख्य दादासाहेब गवई यांचे गेल्या वर्षी 25 जुलैला निधन झाले. त्यांचा यशोचित सन्मान करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मुंबई येथील सर्वपक्षीय सभेत केली होती. आज रोजी घोषणेनुसार स्मारक उभारण्यासाठी मुहूर्तमेढ पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते कमलताई गवई व त्यांच्या कुटुंबियांच्या प्रमुख उपस्थितीत रोवल्या गेली. 
(सौजन्य- महान्यूज)